मुंबई दि.24(एम एमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र शासनाच्या सात कलमी कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण, मुंबई विभाग यांच्या कार्यालयामार्फत २८ मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कोकणभवन, बेलापूर, नवी मुंबई येथे सकाळी ११ ते १२ या वेळेत पार पडणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार शासनाच्या प्रत्येक विभागात सात कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून समाजकल्याण विभागामार्फत हा लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.
या दिवशी नागरिकांना समाजकल्याण विभागाशी संबंधित तक्रारी किंवा निवेदने सादर करण्याची संधी मिळणार आहे. संबंधित तक्रारींसाठी नागरिकांनी प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण कार्यालय, रूम नं. ६१९, ६ वा मजला, कोकणभवन, बेलापूर, नवी मुंबई येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली तक्रार दाखल करावी, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी केले आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
SW/ML/SL
25 March 2025