मुंबई कोस्टल रोडला लता दीदींचे नाव

 मुंबई कोस्टल रोडला लता दीदींचे नाव

मुंबई,दि.६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज प्रथम स्मृतिदिन.या निमित्ताने हाजीअली चौक येथे लतादीदी यांच्या स्मारकाचे भूमिपूजन उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते पार पडले आहे. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी अशा कोस्टल रोडला लतादीदींचे नाव देण्यात यावे अशी मागणी देण्याची मागणी करण्यात आली. स्मारकाच्या भूमिपूजनाच्या  कार्यक्रमासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित आहेत. यासोबत अभिनेते शिवाजी साटम यांच्यासह अन्य कलाकारही उपस्थित होते.

स्वरांचा कल्पवृक्ष असे नाव असलेल्या स्मारकाची निर्मिती स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या स्थानिक विकास निधीतून व महानगरपालिकेच्यावतीने होणार आहे. चाळीस फूट उंची असलेल्या या स्मारकाचे बांधकाम तीन महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे.

काय म्हणाल्या उषा मंगेशकर

“महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा मोठा प्रकल्प होतोय आणि तो आमच्या घराजवळच बनत आहे. त्यामुळं याला दीदींच नाव द्यावं अशी आमची इच्छा आहे. मंगलप्रभात लोढा हे या प्रकल्पाच्या कामात सक्रिय आहेत. महानगर पालिकाही आमच्यासोबत आहे. त्यामुळे याला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात यावं असे आम्हाला वाटत आहे आणि ते होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

मनपाचा बहुचर्चित कोस्टल रोड

दक्षिण मुंबईला जोडणारा 9.98 किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडसाठी 12 हजार 950 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. या प्रकल्पासाठी प्रियदर्शिनी पार्क ते चौपाटी दरम्यान 12.19 मीटर व्यास आणि 2.070 किलोमीटर लांबीचे दोन बोगदे बांधण्यात येत आहेत. 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे मुंबई महानगरपालिकेचे लक्ष्य आहे.

SL/KA/SL

6 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *