बीड हत्या प्रकरण तपास उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली आणण्याची मागणी

 बीड हत्या प्रकरण तपास उच्च न्यायालयाच्या  निरीक्षणाखाली आणण्याची मागणी

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर ह्यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ह्या याचिकेत त्यांनी मस्साजोग सरपंच संतोष देशमुख ह्यांच्या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली आणण्याची मागणी केली आहे. तसेच, निवडणूक आयोगाला प्रतिवादी बनवून मंत्री धनंजय मुंढे ह्यांच्या प्रतिज्ञापत्रात वाल्मिक कराड सोबत असलेल्या कंपन्यांचा उल्लेख न केल्याबद्दल कारवाई करण्याची विनंती केली आहे.

तिरोडकर ह्यांनी याचिकेत पाच कंपन्यांचा उल्लेख केला असून त्यात प्रचंड आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. याबाबतच्या तपासासाठी ईडीमार्फत समांतर तपास सुरु करावा अशी मागणी केली आहे. याचिकेतील कागदपत्रांमध्ये वेंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्विसेस, जगमित्र शुगर मिल्स आणि परळी डेअरी ह्या कंपन्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
तिरोडकर ह्यांच्या या मागणीमुळे हत्येच्या तपासाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ML/ML/SL

28 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *