एनएसयूआय संघटनेवर बंदी घालण्याची मागणी
मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या कार्यालयात दारू पिऊन विद्येच्या मंदिरात राडा घालणाऱ्या विद्यार्थी काँग्रेसच्या नेशनल स्टूडेंट्स यूनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) या संघटनेवर बंदी घालण्यात यावी , या मागणीसाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोंकण प्रदेश अध्यक्ष नीलेश थारवनी व मीडिया प्रमुख गोविंद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो व विद्यार्थ्यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयासमोर जाहीर निषेध आंदोलन केले.
विद्यार्थी काँग्रेसचे एनएसयूआय हे केवळ स्टूडंट युनियन नसून नॅशनल शराबी युनियन ऑफ इंडिया आहे. ते प्रभू श्रीराम विरोधी सुद्धा आहे.’ अशी घणाघाती टीका अभाविपकडून आंदोलनादरम्यान करण्यात आली. मुंबईत झालेल्या आंदोलनावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थी काँग्रेसचा जाहीर निषेध केला आहे.
SW/ML/SL
15 July 2024