मॉरिशियन काळ्या उसाची मागणी वाढली; मिळतोय चांगला दर

वाशिम, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यातील काटा या गावात उत्पादीत होणारा मॉरिशियन काळ्या उसाचे यंदा उत्पादन घटल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे असणाऱ्या काळ्या उसाला वाशीमच्या बाजारपेठेत चांगला ३५-४० रु कांडीप्रमाणे दर मिळत आहे. वाशीम जिल्ह्यातील काटा हे गाव काळ्या उसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, या वर्षी उत्पादन घटल्याने काळ्या उसाला चांगला दर मिळत आहे. एका नगाला ३५ ते ४० रुपयांचा दर मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, तेलंगणा, आणि गुजरातमध्येही या आरोग्यदायी काळ्या उसाची मागणी वाढली आहे. वाशीम शहरासह शेजारील जिल्ह्यांमध्ये या उसामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र सणासुदीच्या काळात गतिमान होत आहे.
ML/ML/SL
18 Jan. 2025