औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची खा.म्हस्के यांची मागणी प्रतिनिधी

नवी दिल्ली, 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीयांवर अमानवीय अत्याचार करून देशाला गुलाम बनविणारे इंग्रज आणि मोगलांच्या स्मारकांना नष्ट करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी बुधवारी संसदेत केली.ठाण्याहून शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर हत्या करणा—या औरंगजेबाची कबरेचे ऐतिहासीक वारसा म्हणून जतन केले जात आहे.
भारतीय पुरातत्व विभागाच्या 3691 ऐतिहासीक स्मारकांपैकी 25 टक्के स्मारके इंग्रज आणि मोगलांचे आहेत. इंग्रज आणि मोगलांनी भारतीयांवर किती अत्याचार केलेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही. यामुळे औरंगजेबाची कबर नष्ट करण्यात यावी अशी मागणी म्हस्के यांनी केली.औरंगजेबाने धर्मांतर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांचा अतोनात छळ केला, हजारो मंदिरे तोडली, शीखांचे नववे धर्मगुरू तेगबहादूरसिंग यांची हत्या केली, गुरुगोविंदसिंग यांच्या दोन्ही मुलांना चार भिंतीत जीवंत मारले अशा औरंगजेबाच्या कबरेचे जतन करायला पाहिजे काय? असा प्रश्न म्हस्के यांनी उपस्थित केला.