CNG Cars ची मागणी 23 टक्क्यांनी वाढली

 CNG Cars ची मागणी 23 टक्क्यांनी वाढली

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला कंटाळून आता भारतीय ग्राहक सीएनजी कार्सच्या वापराला प्राधान्य देत आहेत. सीएनजी कारची मागणी सध्या वाढू लागली आहे. पेट्रोल, डिझेलपेक्षा स्वस्त, अधिक मायलेज व सीएनजी गॅस उपलब्धता ही प्रमुख कारणे विक्री वाढण्यामागे आहे. नाशिक आरटीओमधील नोंदणीनुसार २२-२३ या आर्थिक वर्षात ३६७३ व २३-२४ या आर्थिक वर्षात ४५४३ कारची नोंदणी झाली आहे. पेट्रोल व डिझेलच्या किमती गगनाला भिडत आहे. त्यापेक्षा सीएनजी गॅस हा स्वस्त आहे. नाशिकमध्ये सीएनजी प्रतिकिलो ८८ रुपये आहे. मात्र मुंबई, पुणे या ठिकाणी नाशिक पेक्षाही सीएनजी गॅस स्वस्त आहे. सीएनजी गॅस उपलब्धतेत काही प्रमाणात का होईना सुरळीतपणा आला आहे. सीएनजी कार विक्रीत प्रामुख्याने मारुती सुझुकी, ह्युंदाई व टाटा कंपन्यांचा दबदबा आहे. मारुतीमध्ये सीएनजी कारमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे विक्रीचे प्रमाणही मारुतीचे अधिक आहे.

दोन्ही आर्थिक वर्षाची तुलना केली असता आर्थिक वर्षात जवळपास मागील वर्षांपेक्षा २३ टक्क्याने अधिक मागणी वाढली आहे. गेल्या काही महिन्यात सीएनजी गॅस पूर्वीपेक्षा काही प्रमाणात सहज उपलब्ध होत आहे. तसेच सीएनजी पंपांची संख्याही वाढली आहे. यामुळे येणाऱ्या कालावधीत सीएनजी कार मागणी अधिक वाढणार आहे.पूर्वी सीएनजी कार खरेदीला प्रतिसाद मिळत नव्हता. याचे मुख्य कारण म्हणजे सीएनजी गॅस उपलब्धता अत्यंत कमी प्रमाणात होती. तासनतास रांगेत ताटकळत गॅसची वाट बघावी लागत असे व सीएनजी पंपावरील गॅस कधी संपेल याचा अंदाजही येत नव्हता मात्र यामुळे सीएनजी कार खरेदीस प्रतिसाद मिळत नव्हता. गॅस ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे व वाढलेल्या गॅस पंपांच्या संख्येमुळे सुरळीतपणा आला आहे.

SL/ML/SL

3 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *