दिल्ली हायकोर्टाने फेटाळली ठाकरे गटाची याचिका

 दिल्ली हायकोर्टाने फेटाळली ठाकरे गटाची याचिका

नवी दिल्ली,दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्या प्रकरणी  ठाकरे गटाने निवडणूक आयोगाविरोधात  दिल्ली उच्चन्यायालयात धाव घेतली होती. ही याचिका आज न्यायायलाने फेटाळून लावली आहे, त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. Delhi High Court rejected the petition of the Thackeray group- Maharashtra Politics

ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटामध्ये शिवसेना पक्षावरील हक्कावरून सुरू असलेल्या वादामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या या दोन्ही गटांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही असे आदेश दिले होते. या विरोधात ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली होती.

दोन्ही गटांनी सादर केलेल्या लेखी निवेदन व पुराव्याच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाने ८ ऑक्टोबर रोजी पक्षनाव व निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय घेतला. या हंगामी निर्णयाविरोधात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं होतं. त्यावर कोर्टाने आज निर्णय दिला. तसंच निवडणूक आयोगाला यासंबंधी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय निवडणूक आयोगाच्या अधिकारकक्षेत असल्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं

 

SL/KA/SL

15 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *