दिल्ली स्फोटाच्या तपासाची जबाबदारी मराठी अधिकाऱ्याकडे
नवी दिल्ली, दि. १२ : दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासासाठी NIA ने 10 अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार केले आहे, त्याचे नेतृत्व अतिरिक्त महासंचालक विजय साखरे या मराठमोळ्या पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे. मूळचे नागपूरचे असलेले साखरे हे केरळ केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. साखरे यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकात एक पोलीस सहसंचालक, तीन पोलीस उपसंचालक आणि तीन पोलीस अधीक्षक यांचा समावेश आहे. या पथकासमोर दिल्लीतील स्फोटाच्या मुळापर्यंत जाण्याचे आव्हान असणार आहे.
विजय साखरे हे १९९६ च्या बॅचचे केरळ केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी एनआयएमध्ये महानिरीक्षक म्हणूनही काम केले आहे. केरळमध्ये अनेक महत्वाच्या वरिष्ठ पदांवर त्यांनी काम केले आहे. धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांना एनआयएचे एडीजी म्हणून नियुक्त करण्यात आले.
SL/ML/SL