पाऊस लांबला,अवघ्या पंधरा टक्के क्षेत्रावर पेरणी

 पाऊस लांबला,अवघ्या पंधरा टक्के क्षेत्रावर पेरणी

छायाचित्र प्रातिनिधिक

रत्नागिरी, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मृग नक्षत्र लागून आठवडा उलटून गेला तरी अद्याप मान्सूनचा पत्ता नाही. कोकणात काही ठिकाणा मान्सूनपूर्व पावसाच्या सरी झाल्या असल्या तरीही अद्याप मान्सूनची चाहूल नसल्याने भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरवर्षी ७ ते १० जून या कालावधीत बहुसंख्य शेतकरी भात पेरणीची कामे पूर्ण करतात. यंदा पावसामुळे पेरण्या रखडल्या आहेत. धूळपेरण्या आणि दोन दिवसांपूर्वी ज्या भागात हलका पाऊस झाला तेथील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत.

खरीप हंगामात रत्नागिरी जिल्ह्यात ६७ हजार हेक्टरवर भात लागवड केली जाते. रोपवाटिकांसाठी सात हजार हेक्टरवर पेरण्या होतात. मात्र यावर्षी अद्याप साधारणपणे १५ टक्क्यांपर्यं पेरण्या झाल्या आहेत. पेरण्या उशिरा झाल्यामुळे भात लागवडीला दहा दिवस उशीर होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

यंदा मोसमी पावसाच्या सुरुवातीलाच अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातून हे वादळ गुजरातकडे सरकले आहे. मात्र त्यानंतर वाऱ्याचा वेग मंदावला आणि कोकणात पावसाचा जोरही कमी झाला आहे. मागील दोन दिवसांत हलक्या सरी काही तालुक्यांत पडल्या. पण त्याचा पेरणीसाठी फारसा उपयोग झालेला नाही.

SL/KA/SL

16 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *