दीपाली सय्यद यांनी राज्यपालांच्या उपस्थितीत लावली बोगस लग्ने

 दीपाली सय्यद यांनी राज्यपालांच्या उपस्थितीत लावली बोगस लग्ने

सांगली, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अनेक लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आणि बोगस लग्न लावली असा खळबळजनक आरोप त्यांच्या माजी स्वीय सहाय्यकाने केला आहे.

लग्न झालेल्या जोडप्यांची पुन्हा लग्न लावून सय्यद यांनी तो सामुदायिक विवाह सोहळा दाखवला ,राज्यपाल यांच्या उपस्थितीत लग्नात दिलेले सोने देखील बनावट होते असे आरोप त्यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले भाऊसाहेब शिंदे यांनी आज केले.

ज्यांची लग्न लावली त्या जोडप्यांना अपत्य आहेत. दीपाली सय्यद ट्रस्टच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये हडपले , ट्रस्टच्या खात्यात फक्त 9 हजार, मग कोट्यवधी रुपये आणले कोठून आणि दिले कोणाला असा सवाल करीत शिंदे यांनी याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि दीपाली सय्यद यांचे साटेलोटे आहे, दीपाली सय्यद यांचे पाकिस्तान, दुबई कनेक्शन आहे असाही आरोप दीपाली सय्यद यांचे माजी स्वीयसहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केले आहेत.Deepali Syed arranged bogus marriages in the presence of the Governor

राज्यपाल याना पदावरून लवकर हटवावे आणि आर्थिक गुन्हे शाखेने या ट्रस्टची चौकशी केली नाही, तर उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा इशारा भाऊसाहेब शिंदे यांनी दिला आहे.

ML/KA/PGB
7 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *