पैनगंगा रेल्वे स्थानक कायमचे बंद करण्याचा निर्णय
वाशिम दि 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भ आणि मराठवाडा या दोन प्रदेशांच्या सीमेवर असलेले वाशीम जिल्ह्यातील पैनगंगा हे शेवटचे रेल्वे स्टेशन बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे.
पैनगंगा नदीलगत हे रेल्वे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात येत असून या रेल्वे स्थानकासोबत वाशीम तालुक्यातील तोंडगाव, कोकलगाव, देवठाणा, सुरजखेड आदी गावातील लोकांना हिंगोली, हैदराबाद व अकोलाकडे रेल्वे जाता येत होते. मात्र, या रेल्वे स्टेशन मधून आवागमन होणाऱ्या दैनंदिन प्रवाशांची कमी असलेली संख्या तसेच या ठिकाणी रेल्वे स्टेशन चालवीण्यासाठी लागणारा पुरेसा कर्मचारी वर्ग याचा तुलनात्मक अभ्यास करता हे रेल्वे स्टेशन चालू ठेवणे दक्षिण मध्य रेल्वेसाठी तोट्याचे होत असल्याने ते कायमचे बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने आज घेतला आहे.
नांदेड रेल्वे विभागातील पैनगंगा हे रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी आता कायमचं बंद करण्यात आलं आहे. विभागातील पूर्णा ते अकोला सेक्शन मधील हे स्थानक असून या रेल्वेस्थानकावर यापुढे कोणतीही रेल्वे गाडी थांबणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वे कडून कळवण्यात आलं आहे.
ML/KA/SL
19 Dec. 2022