विधानसभा निवडणूकीपूर्वी घेतला जाईल जुन्या पेन्शन बाबत निर्णय

नागपूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय येणाऱ्या राज्य विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी घेतला जाईल असे आज सरकारच्या वतीने विधान परिषदेत जाहीर करण्यात आले.
या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी विक्रम काळे यांनी विधान परिषदेत मुद्दा मांडला यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, जुन्या पेन्शन बाबत सरकारने सकारात्मक पाऊले उचलली असून यासाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. यावर चर्चेसाठी विविध शिक्षक संघटनासह संबंधितांना लवकरच बोलवू. त्यामुळे शिक्षक संघटनांनी पुकारलेला 14 डिसेबर पासूनचा संप रद्द करण्याची विनंती फडणवीस यांनी सभागृहात शिक्षक संघटनांना केली.
सरकारचा कोणताही इगो अथवा आडमुठेपणाची भूमिका नसून सर्वसामान्य नागरीकांना त्रास होईल अशी कोणतीही कृती शिक्षक संघटनांनी करू नये अशी विनंतीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली.
त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, राज्यातील महायुती सरकार जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक असून विधान सभेची निवडणूक लागण्यापूर्वी याबाबत निर्णय घेण्यात येईल.
SL/KA/SL
12 Dec. 2023