प्रादेशिक बातम्या स्थलांतरणाचा निर्णय स्थगित…
पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुणे आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट औरंगाबादला हलवण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्थगिती दिली आहे.
खासदार प्रकाश जावडेकर यांनी ठाकूर यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात चर्चा केली. तसेच प्रसार भारतीचे अपूर्व चंद्र आणि मुख्य कार्यकारी अधिकारी द्विवेदी यांच्याशीही जावडेकर यांची चर्चा झाली आहे.Decision on regional news migration postponed…
पुणे आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्यांचे युनिट औरंगाबादला हलवण्याचा निर्णय आकाशवाणी ने घेतला होता, या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध होत होता , आस्थापना पूर्ण नसल्याचे कारण देत हा निर्णय घेण्यात आला होता, याआधी या बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्याचेही घाटले होते . हा निर्णय रद्द करावा यासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्र लिहून निर्णय मागे घेण्याची विनंती केंद्र सरकारला केली होती, जावडेकर यांनी अनुराग ठाकूर यांच्याशी फोनवर चर्चा केली, त्यानंतर हा स्थगिती निर्णय घेण्यात आला.
जावडेकर सध्या हैदराबाद येथे असून त्यांनी या विषयासंदर्भात अनुराग ठाकूर यांच्याशी फोनवर चर्चा केली ,या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. या बाबत स्वतंत्र सविस्तर चर्चा जावडेकर दिल्लीत गेल्यानंतर होणार आहे. सध्या तरी या प्रादेशिक बातम्या स्थलांतरित होणार नाहीत मात्र दिल्लीत बसलेल्या बाबूंच्या डोक्यातून हे खूळ जात नाही तोपर्यंत हे संकट काही टळलेले नाही.
ML/KA/PGB
15 Jun 2023