डिकॅथलॉन इंडियाची आघाडी: स्पोर्ट्स रिटेलमध्ये चक्रीयता मूलभूत बिझनेसमध्ये आणणारी पहिली कंपनी

पुणे, दि 4
जागतिक स्तरावरील आघाडीच्या मल्टी-स्पेशालिस्ट स्पोर्ट्स ब्रँड डिकॅथलॉनने आज भारतात त्यांचे चक्रीय व्यवसाय मॉडेल (सर्क्युलर बिझनेस मॉडेल) आणण्याची घोषणा केली. त्यामुळे शाश्वतता, कचरा कमी करणे आणि पुनरुत्पादक व्यवसायासाठीची त्यांची जागतिक वचनबद्धता अधोरेखित झाली. दुरुस्ती, पुनर्खरेदी, पुनर्विक्री आणि डीआयवाय स्पेअर्स यासारख्या चक्रीय मॉडेल्सद्वारे डिकॅथलॉन २०२७ पर्यंत आपल्या चक्रीय उलाढालीत तिप्पट वाढ करेल. ही वाढ २०२४ च्या तुलनेत २००% असेल.
या महत्त्वाच्या पावलासोबत डिकॅथलॉन भारतातील पहिली अशी स्पोर्ट्स रिटेलर कंपनी ठरली आहे जी व्यापक प्रमाणात चक्रीय व्यवसाय करेल. डिकॅथलॉनचे भारतातील चक्रीय व्यावसायिक मॉडेल सध्या प्रामुख्याने तीन गोष्टींवर आधारित आहे: ९५ पेक्षा जास्त स्टोअर्समध्ये उपलब्ध असलेल्या दुरूस्ती सेवा, ९० पेक्षा जास्त स्टोअर्समध्ये नूतनीकरण केलेल्या उत्पादनांची पुनर्विक्री आणि ५० पेक्षा अधिक स्टोअर्समध्ये वापरलेल्या उपकरणांची पुनर्खरेदी. ती देशभरात हळूहळू वाढवली जाईल आणि नंतर ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाईल. या सेवा केवळ डिकॅथलॉनच्या उत्पादनांचे आयुष्य तर वाढवतातच पण त्याचबरोबर तर वाया जाणारे उत्पादन आणि उत्पादनाच्या कार्बन फूटप्रिंटही कमी करतात. त्यामुळे २०२७ पर्यंत ३,००,००० हून अधिक क्रीडा उत्पादने कचराकुंड्यांमधून बाहेर काढली जाऊ शकतात. त्यामुळे पर्यावरणावरील प्रभाव खूप कमी होईल.
भारतातील अनावरण शून्य कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यात २०५० पर्यंत शून्य हरितगृह वायू उत्सर्जन साध्य करणे आणि २०३० पर्यंत कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जनात ४२% घट करणे समाविष्ट आहे. सध्या एकल-वापर प्लास्टिकचा वापर थांबवणे, दीर्घकाळ टिकणारी, दुरुस्तीयोग्य उत्पादने डिझाइन करणे, दुसऱ्या आयुष्यातील उपाययोजनांचे प्रमाण वाढवणे आणि साइटवरील उत्सर्जन कमी करणे या गोष्टींवर भर दिला जात आहे.
डिकॅथलॉन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर चॅटर्जी म्हणाले की “आम्हाला सुलभता आणि शाश्वतता एकत्र चालल्या पाहिजेत असे आमचे मत आहे. आमचे ग्राहक जसजसे वाढत जातात तसतसे पर्यावरणीय परिणाम कमी करणारे आणि परवडणारे उत्पादन देण्याची आमची जबाबदारीदेखील वाढते. शाश्वतता ही आमच्यासाठी कायमस्वरूपी वचनबद्धता आहे, परंतु जागतिक पर्यावरण दिन साजरा करताना जबाबदारीने वापराबाबत आमची कटिबद्धता स्पष्ट करण्यासाठी सेकंड लाइफ बाजारपेठेला खूप महत्त्व आहे. या मोहिमेद्वारे आम्ही स्पोर्ट्स रिटेल विक्री अशा प्रकारे पुनर्कल्पना करत आहोत जिथे कमी पैसे देऊन लोकांना जास्तीत जास्त खेळता येईल आणि पृथ्वीसाठी व त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी चांगले पर्याय निवडता येतील.”
डिकॅथलॉन इंडियाच्या शाश्वत विकास प्रमुख अॅनी जॉर्ज म्हणाल्या, “जगभरात पोहोचलेला ब्रँड म्हणून आम्ही आमच्या उत्पादनांचे डिझाइन, वितरण आणि परत घेण्याच्या पद्धतीमध्ये शाश्वतता समाविष्ट करावी असे आम्हाला वाटते. भारत चक्रीय अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना आम्ही प्रत्यक्ष, व्यापक उपाययोजना देण्यावर भर देतो – त्यात टिकाऊ उत्पादने डिझाइन करण्यापासून ते सुलभ दुरुस्ती आणि पुनर्खरेदी करण्यापर्यंत गोष्टी समाविष्ट आहेत. यात केवळ पर्यावरणीय परिणाम कमी करणे नाही तर अधिक जबाबदार पद्धतीने लोक जास्तीत जास्त कसे खेळतील याची काळजी घेण्याचा समावेश आहे.”
डिकॅथलॉनने पाच वर्षांपूर्वी फ्रान्स, स्पेन, इटली, पोर्तुगाल, यूके आणि पोलंड अशा बाजारपेठांमध्ये आपले चक्रीय व्यवसाय मॉडेल आणले. तिथे त्यांनी दुरुस्ती आणि डीआयवाय स्पेअर्स आणि अॅक्सेसरीजमध्ये ग्राहकांकडून जास्तीत जास्त वापर आणि परिपक्वता पाहिली आहे. भारतात डिकॅथलॉनने कमी-प्रभाव असलेल्या चक्रीय स्पोर्ट्स रिटेलमध्ये जागतिक स्तरावरील कंपनी म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. ही कंपनी अधिक शाश्वत भविष्य घडवताना लोकांना जास्तीत जास्त खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे.