मोतीबाग तलावातील हजारो माशांचा मृत्यू
जालना, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहराचे आकर्षण असलेल्या मोतीबाग तलावाच्या पाळूला अक्षरश मृत्यू झालेल्या माशांचा खच बघायला मिळत आहे.Death of thousands of fishes in Motibag lake
अज्ञात रोगाने या माशांचा मृत्यू होत असल्याची शक्यता वर्तविली जात असून काल दुपारी ३ च्या सुमारास हजारो माश्या तलावाच्या पाण्यात तरंगताना दिसून येऊ लागल्या आहेत.माश्यांचा मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही,मात्र या माश्याच्या मृत्यूमुळे तलाव परिसरात दुर्गंधी पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पालिका प्रशासनाने तलाव परिसर स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.जवळपास तलावात 4 टन माश्या असल्याचे मच्छि बीज टाकणाऱ्या गुत्तेदारकडून सांगण्यात येत असून या माश्यांच्या मृत्युमुळे त्यांचे मोठं नुकसान झाले आहे.मृत माशांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत.
काल तलावाच्या काठाजवळ तसेच पाण्यावर तरंगताना हे मृत्युमुखी पडलेले मासे आढळून आले.तर काही ठिकाणी मृत माशांचा अक्षरशः खच पडलेला दिसून आल्यामुळे पशुधन विभागाच्या एका पथकाने मेलेल्या माशांचे नमुने तपासणीसाठी नेले असता डॉक्टरांनी या माशांची तपासणी करत शवविच्छेदन केले.
प्रथमदर्शनी या माशांचा मृत्यू संसर्गजन्य आजाराने झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय. शिवाय मृत माशांचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवणार असल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ.विजय झांबरे यांनी सांगितले आहे.
ML/KA/PGB
4 Mar. 2023