डॉ.प्रभाकर मांडे यांच्या निधनाने समरसता चळवळीची हानी

 डॉ.प्रभाकर मांडे यांच्या निधनाने समरसता चळवळीची हानी

छ. संभाजीनगर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, संशोधक आणि लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ प्रभाकर मांडे यांचे काल सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.ते ९० वर्षांचे होते. डॉ. मांडे हे दुसऱ्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

समरसता विषयांची मुलभूत स्वरूपाची त्यांनी मांडणी केली होती. मांग आणि त्यांचे मागते, उपेक्षित पर्व, गावगाड्या बाहेर, लोक गायकांची परंपरा, हिंदुत्व अशा अनेक ग्रंथाचे लेखन डॉ प्रभाकर मांडे यांनी केले आहे. विद्यार्थी दशेत असताना त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभला होता. महाराष्ट्र शासनाने त्यांची अध्यक्ष म्हणून ग्रंथ निवड समितीवर नियुक्ती केली होती.

अनेक शासकीय आणि अशासकीय संस्थेसाठी लोककला, लोकसाहित्य या विषयावर त्यांनी काम केले होते. डॉ. मांडे यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. याच वर्षी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार सन्मानित केले होते.
डाॅ. मांडे यांनी आयुष्याच्या शेवटच्या काळातही आपले अध्ययन सुरू ठेवले होते. समरसता साहित्य हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता.

समरसता साहित्य परिषदेच्या वाटचालीत मांडे यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यांनी केलेल्या वैचारिक मांडणीच्या आधाराने समरसता मंच, भटके विमुक्त परिषद, समरसता साहित्य परिषद या संस्थांची वाटचाल झाली आहे. डॉ. मांडे यांच्या निधनाने समरसता चळवळीची हानी झाली आहे. डॉ प्रभाकर मांडे यांच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

ML/KA/SL

22 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *