बोअरवेलमध्ये अडकलेल्या ५ वर्षाच्या आर्यनचा मृत्यू, 57 तास चालू होते बाहेर काढण्यासाठी प्रयत्न
T: बोअरवेलमध्ये अडकलेल्या ५ वर्षाच्या आर्यनचा मृत्यू, 57 तास चालू होते बाहेर काढण्यासाठी प्रयत्न
राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात 3 दिवसांपासून बोअरवेलमध्ये अडकलेल्या 5 वर्षांच्या आर्यनचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री 11.45 वाजता आर्यनला सुमारे 57 तासांनंतर बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. त्याला अत्याधुनिक लाइफ सपोर्ट सिस्टीमने सुसज्ज रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. एनडीआरएफच्या टीमने दुसऱ्या मशीनच्या सहाय्याने बोअरवेलजवळ खड्डा खोदून आर्यनला सुमारे १५० फूट खोल बोअरवेलमधून बाहेर काढले. सुमारे ५७ तास बोअरवेलमध्ये अडकलेल्या आर्यनला अन्न आणि पाणी पुरवण्यात प्रशासन आणि बचाव पथकाला अपयश आले होते. आर्यन सोमवारी (9 डिसेंबर) दुपारी 3 वाजता घरापासून 100 फूट अंतरावर असलेल्या बोअरवेलमध्ये पडला होता. या कुटुंबाने तीन वर्षांपूर्वी ही बोअरवेल खोदली होती. मात्र, त्यात मोटार अडकल्याने ती काम करत नव्हती. पण ही बोअरवेल झाकलेली नव्हती. त्यामुळे ही घटना घडली. तो आईसोबत खेळत असताना ही घटना घडली. त्यामुळे त्याच्या आईची प्रकृतीही सध्या खालावलेली आहे.