लाडक्या बहिणींनो,२४ डिसेंबरपासून तुमच्या खात्यात जमा होईल ’इतकी ‘ रक्कम
महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना नव्या सरकारमध्येही सुरू आहे. या योजनेत विधानसभा निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार होता. तर याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत 35 लाख महिलांना पैसे दिले जाणार आहेत. या योजनेत डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सहावा हप्ता येणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आता पैसे जमा होण्यास आजपासून (24 डिसेंबर) सुरुवात होणार आहे.आजपासून बहिणींच्या खात्यात १५०० रूपये जमा होणार आहेत.
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहीण योजनेची रक्कम बहिणींच्या खात्यात दिली जाईल असं म्हटलं होतं. त्यानुसार, याच वर्षी लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हफ्ता मिळणार आहे. हा हफ्ता देण्याची प्रक्रीया आजपासून सुरु झाली असून विधानसभा निवडणुकांच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रीया आजपासून पुन्हा सुरु झाल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.