“प्रिय बाबा…” शरद पवारांना वाढदिवसानिमित्त लेकीकडून खास शुभेच्छा

 “प्रिय बाबा…” शरद पवारांना वाढदिवसानिमित्त लेकीकडून खास शुभेच्छा

मुंबई , दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये केंद्रातील कृषीमंत्री पदापासून ते राज्यच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस. सामाजिक,राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळातून शरद पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात त्यांची लेक आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. या खास आणि लक्षवेधक शुभेच्छा ठरल्या आहेत.”Dear Baba…” Special birthday wishes to Sharad Pawar

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खास ट्वीट केलं आहे. हे ट्विट अत्यंत मोजक्या शब्दात असले तरी नेमके आहे. या ट्वीटसोबत त्यांनी वडिलांबरोबरचा फोटोही शेअर केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, “प्रिय बाबा, तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात. समाजकारण, राजकारण या क्षेत्रांसह कौटुंबिक पातळीवर देखील तुम्ही आम्हा सर्वांचे आदर्श आहात. तुमच्या विचारांची स्वाभिमानी मशाल घेऊन आम्ही सर्वजण आपल्यासोबत अविश्रांत चालण्याचा प्रयत्न करीत आहोत. बाबा, तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शरद पवार यांना ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ML/KA/PGB
12 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *