अदानी ग्रीन पावर आणि गुगल यांच्यात महत्त्वपूर्ण करार

 अदानी ग्रीन पावर आणि गुगल यांच्यात महत्त्वपूर्ण करार

मुंबई दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरित ऊर्जा निर्मिती कंपनी अदानी ग्रीन पावर आणि Google यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला आहे.या कराराअंतर्गत गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या 30 गिगावॅट सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पातून गुगलच्या क्लाऊडच्या डेटा सेंटरसाठी वीज पुरवठा करण्यात येणार आहे. 2025 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये अदाणी समूहाच्या या जगातील सर्वात मोठ्या हरित उर्जा प्रकल्पात पूर्ण क्षमतेनं वीज निर्मीती सुरु होईल.

Google ने आपली सगळी डेटा सेंटर हरित उर्जेवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. डेटासेंटरला लागणारी वीज हरित उर्जा प्रकल्पातून निर्मित असल्यास ते डेटा सेंटर देखील हरित डेटा सेंटरच्या यादीत सामील होते. गुगलच्या या निर्णयाला आता अदानी समूहाची साथ लाभणार आहे.

कच्छच्या रणात उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पातून 81 दशलक्ष युनिट हरित वीज निर्मिती होईल. जवळपास 1 कोटी 61 लाख कुटुंबांनी या प्रकल्पातून सौर उर्जा पुरवठा होणार आहे. त्याच प्रकल्पातून आता Google Data Centre ला ही वीज पुरवठा होईल.

SL/ML/SL

5 Oct. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *