राज्यात सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजने अंतर्गत सात हजार मेगावॉट विजेची निर्मिती साठी निविदा मागवल्या आहेत, येत्या तीन वर्षात १३ हजार मेगावॉट वीजनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे अशी माहिती ही फडणवीस यांनी यावेळी दिली. या योजनेतून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या ऊर्जा विभागाच्या चर्चेला ते उत्तर देत होते.
ही वीज आपल्याला २.९० रुपये किंवा ३.१० रुपये युनिट या दराने उपलब्ध होणार आहे. त्यामुळे व्यावसायिक वापरासाठी च्या वीज दरात घट होईल , व्यावसायिकांवर पडणारा सध्याचा वाढीव वीज दर सबसिडीचा भार कमी होईल, देशातील सर्व प्रमुख सौर ऊर्जा उत्पादक कंपन्या या योजनेत सहभागी होत आहेत असं ते म्हणाले.
आपली ही योजना केंद्र सरकारने ही स्वीकारली आहे आणि सर्व राज्यांना या योजनेची अंमलबजावणी आपापल्या राज्यात करणच्या सूचना दिल्या आहेत असे ही फडणवीस म्हणाले.
ML/KA/SL
2 Aug 2023