डॉ. बाबासाहेब आंबेडकर दवाखान्याचा आधुनिकीकरण सोहोळा उत्साहात

मुंबई, दि. २९ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावात, आंबडवे, ता. मंडणगड , जिल्हा रत्नागिरी येथे ‘वैद्यकीय उपकरणांचा हस्तांतरण सोहळा’ अत्यंत यशस्वीपणे पार पडला.
या सोहोळ्यात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व परीक्षेत उत्तीर्ण मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या.
सर्व उपस्थित बंधू-भगिनींच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे आणि सहकार्यामुळे सोहळ्याची शोभा अनेक पटींनी वाढली. उपस्थितांचा विश्वास व पाठिंबा आयोजकांसाठी प्रेरणादायी ठरला. मायभूमी फाऊंडेशन चे अनंत काप, देवेंद्र, महादेव रा. धामणे यांनी केलेल्या मार्गदर्शन व सहकार्याबद्दल त्यांचेही आभार मानले.
डॉ. खान व आंबडवे दवाखान्याचे सेवक-सेविका, ग्रामपंचायत शिगवणचे सरपंच, आंबडवे आरोग्य समिती यांच्या सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले.
हे आधुनिकीकरण समारोहाचे शिवधनुष्य लीलया पेलणाऱ्या
विजय घरटकर व त्यांच्या डॉ. सुशांत, बांद्रे, कॅप्टन शरद धामणे, दीपक धामणे, इंजि. रुपेश बांद्रे, भावेश धामणे, नितेश धामणे, चंद्रकांत बोर्ले, अमोल घरटकर, मनोहर घरटकर या सर्व सहकाऱ्यांचे खूप कौतुक होत आहे. त्यांनी हा उपक्रम करून समाजाला, पंचक्रोशीला तसेच मंडणगड तालुक्यातील नवतरुणांना प्रेरणादायी संदेश दिला अशी भावना व्यक्त करण्यात आली.
आरोग्य मंदिर आणि विद्या मंदिरावर लक्ष केंद्रित करा. आपल्या सामर्थ्यानुसार योगदान द्या आणि समाजाच्या विकासात सहभाग घ्या, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दिग्दर्शक सुनील माळी, मुरलीधर जगताप, मनोहर घरटकर यांनी समारंभाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. या भव्य सोहोळ्याची दखल सर्वत्र घेण्यात येत असून पंचक्रोशीतील नवतरुण व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
सोहोळ्याला मान्यवर अधिकारी, डॉक्टर, सरपंच, आरोग्य समिती सदस्य, पत्रकार सचिन माळी व सहकारी यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.ML/ML/MS