स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे फरार, माहिती देणाऱ्यास मिळणार ‘इतके’ लाख
स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या प्रकरणी आरोपी दत्ता गाडेची ओळख पटली असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी १३ पथके तैनात केली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध सुरू आहे. अद्याप तो सापडला नसल्याने पोलिसांनी त्याला शोधून देणाऱ्याला तब्बल १ लाखांचं बक्षिस जाहीर केले आहे. दरम्यान, आरोपीच्या कुटुंबियांची चौकशी सुरू आहे. त्याच्या भावाला चौकशीकरता ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच स्वारगेट स्थानकात तैनात असलेल्या २३ सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आलं आहे.