विधान परिषद आश्वासन समितीच्या समिती, दरेकरांनी पदभार स्वीकारला

मुंबई दि ६– विधानमंडळाच्या महत्वाच्या विधान परिषद आश्वासन समितीच्या समिती प्रमुख पदाचा प्रवीण दरेकरांनी आज विधानभवन येथे जाऊन पदभार स्वीकारला. विधान परिषदेच्या सभापतींनी नुकतीच विधानमंडळाच्या विविध समित्यांवर सदस्यांची नामनियुक्ती केली होती.
विधान परिषदेचे गटनेते असलेल्या प्रवीण दरेकरांना महत्वाच्या विधान परिषद आश्वासन समितीवर समिती प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी विधीमंडळाचे अवर सचिव (समिती) सुरेश मोगल व अन्य सहकारी अधिकारी उपस्थित होते. सन २००३ पासूनच्या प्रलंबित आश्वासनांचा यावेळी प्रवीण दरेकरांनी आढावा घेतला व अधिकाऱ्यांना आश्वासनांवरील चर्चेसाठी प्राधान्यक्रम ठरविण्याच्या सूचना दिल्या.
ML/MS