कोळसा घोटाळा प्रकरणी दर्डा पिता-पुत्र दोषी

 कोळसा घोटाळा प्रकरणी दर्डा पिता-पुत्र दोषी

नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता, के एस क्रोफा, के सी सामरिया हे दोन प्रशासकीय अधिकारी,जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जैस्वाल यांना दोषी ठरवलं आहे. दिल्लीतील विशेष कोर्टाने आज हा निकाल दिला आहे. या सगळ्यांना 18 जुलै रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.न्यायालयाने त्यांना आयपीसी कलम १२०बी, ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे.

या प्रकरणी आधीही बऱ्याच लोकांना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये आयएएस अधिकारी समीर बिश्नोई, सौम्या चौरसिया, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव, सूर्यकांत तिवारी, कोळसा घोटाळ्यात सिंडिकेट म्हणून काम करणारे सुनील अग्रवाल अशी मोठी नावे आहेत.

दरम्यान, या प्रकरणी ईडीकडून माजी जिल्हाधिकारी आयएएस रानू साहू यांच्यासह अनेकांची चौकशी सुरू आहे. कोळसा खाण वाटपातील अनियमिततेप्रकरणाशी संबंधित आहे. ज्यामध्ये आज दिल्लीतील ईडी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. भविष्यात या घोटाळ्याशी संबंधित अनेक बड्या लोकांना अटक करू शकते.

SL/KA/SL

13 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *