माळीणजवळील पसारवाडी डोंगरावर दरड कोसळली

पुणे दि २३:– माळीण दुर्घटनेच्या आठवणी ताज्या करणारी घटना आज सकाळी घडली माळीणजवळील पसारवाडी येथे डोंगरकड्यावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी पसारवाडी गावाचा संपर्क तुटला आहे, दरड कोसळल्यामुळे डोंगरमाथ्यावरील मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.या गावातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून संभाव्य धोका लक्षात घेता पुनर्वसनाची मागणी केली होती.
माळीण दुर्घटनेनंतर पसारवाडीच्या पुनर्वसनाची चर्चा शासकीय पातळीवर झाली होती, मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम सुरु न झाल्याने गावकरी अजूनही पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत. आजच्या घटनेनंतर पुनर्वसनाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. ML/ML/MS