मुसळधार पावसाने करूळ घाटात दरड कोसळली

सिंधुदुर्ग दि १६– जिल्हा आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या करुळ घाटात आज सकाळी दरड कोसळली .मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर आल्याने घाट मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला होता. दरम्यान वाहतूक भुईबावडा आणि फोंडाघाट मार्गे वळवण्यात आली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दरड कोसळल्याच्या ठिकाणी धाव घेत माती दूर करण्याचे काम ताबडतोब सुरू केले. दुपारी अडीच च्या सुमारास या घाट मार्गातील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात प्राधिकरणाला यश आले आहे. ML/ML/MS