अवकाळी पावसामुळे केळी, द्राक्ष बागांचे नुकसान

 अवकाळी पावसामुळे केळी, द्राक्ष बागांचे नुकसान

नाशिक, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कालपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे खानदेशात बहुतांश जिल्ह्यात केळी, टोमॅटो आणि द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने केळी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. केळीच्या बागा उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, निफाड, मनमाड, नांदगांव , चांदवड आणि येवला तालुक्यामध्ये रविवारी वादळी वा-यासह पाऊस आणि गारपीट झाल्याने तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यातील प्रामुख्याने द्राक्षबागा, फळबागा तसेच टोमॅटो, कांदारोपे, गहू, हरबरा, ऊस, भातपीक, भाजीपाला इत्यादी पीके अवकाळी पावसामुळे तसेच गारपीटमुळे भुईसपाट होऊन पावसात भिजल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी या आसमानी संकटात धीर धरावा आणि घाबरून जाऊ नये नुकसानग्रस्तांना शासन स्तरावरून या नैसर्गिक आपत्तीने झालेली नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. Damage to bananas, vineyards due to unseasonal rains

ML/KA/PGB
27 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *