सलग तिसऱ्या आठवड्यात दलाल स्ट्रीट तेजीत

 सलग तिसऱ्या आठवड्यात दलाल स्ट्रीट तेजीत

मुंबई, दि. 15 (जितेश सावंत):  जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक कल,सतत परकीय भांडवलाचा ओघ,ऑटो आणिआयटी समभागातील वाढ, देशांतर्गत आणि जागतिक डेटातील सुधार, मान्सूनची चांगली प्रगती,चांगली तिमाही कमाई यामुळे बाजाराने 14 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात नवा विक्रम नोंदवला.

बाजाराचे वाढलेले मूल्यांकन(valuation) हा थोडा चिंतेचा विषय असून देखील बाजार नवे विक्रम रचत आहे.त्यातील अजून एक महत्वाचे कारण म्हणजे, अमेरिकेतील महागाई वाढल्याने आणखी दर वाढण्याची चर्चा होती. पण जाहीर केलेल्या डेटानुसार महागाई अपेक्षेपेक्षा कमी झाली पर्यायाने फेडरल रिझर्व्ह जुलैनंतर दर वाढवणार नाही, अशी आशा निर्माण झाली.यामुळे सेन्सेक्सने पहिल्यांदाच 66,000 चा टप्पा पार केला तर निफ्टीने 19,595 ह्या नव्या उच्चांकाला स्पर्श केला.

शुक्रवारी निफ्टी आयटी पॅकमध्ये सप्टेंबर 2020 पासून एक दिवसाची सर्वात मोठी वाढ झाली व त्यामुळेच बाजाराला नवा विक्रम करता आला.
Technical view on nifty-. बाजाराने गेल्या आठवड्यात नवीन विक्रमी पातळी गाठली. बाजार जरी नवे विक्रम रचत असला तरी बाजार तांत्रिक दृष्ट्या ओव्हर बॉट झोन (overbought) मध्ये आहे.सेक्टर रोटेशन(sector rotation) मुळे बाजारात वाढ होताना दिसत आहे.निफ्टी व सेन्सेक्सने अनुक्रमे 19,595.35 व 66,159.79 हे विक्रमी स्तर गाठले. येणाऱ्या काळात निफ्टी 19,800-20000-20160 हे स्तर देखील गाठू शकेल परंतु त्यापूर्वी बाजारात घसरण होण्याची शक्यता अधिक आहे.

निफ्टीसाठी 19433-19385-19361 हे महत्वपूर्ण सपोर्ट स्तर राहतील हे तोडल्यास निफ्टीतील घसरणवाढेल व निफ्टी 19327-19300-19246-19234-19201-19189-19011-19,000 हे स्तर गाठेल. येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष EU,UK चा CPI data, US रिटेल सेल्स data तसेच तसेच विदेशी गुंतवणूकदारांचा कल याकडे असेल.

सेन्सेक्स 64 अंकांनी वाढला

जागतिक बाजारात संमिश्र कारोभार असूनही आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजाराची सुरुवात तेजीने झाली.दिवस जसजसा वाढत गेला तसतसा तेजीचा वेग वाढला मात्र दुपारनंतर झालेल्या नफावसुलीने सर्व नफा पुसला गेला.देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्री मधील तेजीमुळे बाजरा सावरण्यास मदत झाली.रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग 52 आठवड्यांच्या उच्चांकावर,2755 रुपयांवर पोहोचला.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 63.72 अंकांनी वधारून 65,344.17 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 24.10 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,355.90 चा बंद दिला. RIL shines in lacklustre trade,Sensex ends 64 pts up
सेन्सेक्स 274 अंकांनी वाढला.

स्थानिक शेअर बाजारातील तेजी मंगळवारीही कायम राहिली. बाजार सकाळपासून एका विशिष्ठ पातळीभोवतीच फिरत होता. जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक कल आणि सतत परकीय भांडवलाचा ओघ,ऑटो आणि आयटी समभागातील वाढ यामुळे बाजार वरच्या स्तरावर जाताना दिसला.दिवसभराच्याअखेरीस सेन्सेक्स 273 अंकांनी वधारून 65,617.84 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 83.50 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,439.40 चा बंद दिला.
Sensex ends range-bound session 274 pts up

बाजारात सुस्ती,सेन्सेक्स 224 अंकांनी घसरला

जागतिक बाजारातून मिळालेल्या संमिश्र संकेतांमुळे आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय बाजरात थोडी नरमाई दिसली.
भारतआणि यूएसमधील जाहीर होणाऱ्या CPI चलनवाढीच्या डेटाच्या आधी गुंतवणूकदार काहीसे सावध होताना दिसले.परंतु दिवसाच्या शेवटी बँकिंग आणि आयटी समभागात विक्री झाल्याने बाजारात घसरण झाली.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 223.94अंकांनी घसरून 65,393.90 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 55.10 अंकांची घट होऊन निफ्टीने 19,384.30 चा बंद दिला. Sensex drops 224 points

बाजार विक्रमी उच्चांक राखण्यात अपयशी ठरला.
सकारात्मक जागतिक संकेतांमुळे ,गुरुवारी बाजाराने जोरदार सुरुवात केली आणि सुरुवातीच्या काही तासांत नवीन विक्रमी उच्चांक नोंदवला, सेन्सेक्सने प्रथमच 66,000चा टप्पा पार केला. परंतु PSU बँक, तेल आणि वायू आणि उर्जा या क्षेत्रातील समभागात नफावसुलीमुळे शेवटच्या तासात बाजारात तीव्र घसरण झाली परंतु सत्र सकारात्मक नोटवर बंद करण्यात बाजार यशस्वी झाला.दिवसभराच्याअखेरीससेन्सेक्स 164.99 अंकांनी वधारून 65,558.89 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 29.50 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,413.80 चा बंद दिला. Market fails to hold record high

बाजार नव्या विक्रमी उच्चांकावर

IT समभागांच्या मजबूत तेजीमुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारांनी नवीन शिखर गाठले.दोन्ही बेंचमार्क निर्देशांक त्यांच्या ऑल टाईम उच्चांकावर बंद झाले. सेन्सेक्स पहिल्यांदाच 66,000 चा टप्पा पार केल्यानंतर बंद झाला. तर निफ्टीने 19,595 च्या नव्या सार्वकालिक उच्चांकाला स्पर्श केला.मजबूत जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर, बाजाराची सुरुवात सकारात्मकतेने झाली आणि सत्राच्या बहुतांश भागांमध्ये तो रेंजबाऊंड राहिला. तथापी, शेवटच्या तासांच्या खरेदीने बाजाराला नवीन उच्चांक नोंदवण्यास मदत झाली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 502.01 अंकांनी वधारून 66,060.90 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 150.70 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,564.50 चा बंद दिला. Market at fresh record high Dalal Street rose for the third week in a row

( लेखक शेअरबाजारतज्ञ,
तसेच Technical and Fundamental Analyst आहेत )

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
15 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *