Indian dal. Traditional Indian soup lentils. Indian Dhal spicy curry in bowl, spices, herbs, rustic black wooden background. Authentic Indian dish. Overhead
सगळ्यात आधी काळे उडीद आणि राजमा स्वच्छ धुवून 4-5 तास पाण्यात भिजवून ठेवावे. आता कुकरमधे उडीद व राजमा मीठ चवीनुसार घालून 3-4 शिट्टीत शिजवून घ्यावे. आल लसुण पेस्ट करून घ्यावी. टोमॅटो प्युरी करून घ्यावी.
आता एका कढईत तेल व बटर घालून फोडणी करावी व त्यात कांदा,आले-लसूण पेस्ट,टोमॅटो प्युरी घालून परतून घ्यावे
आता तयार मिश्रणात लाल मिरची पावडर,मीठ,गरम मसाला,कीचन कींग मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.
आता शिजवलेली डाळ घालून पळीने घोटून घ्यावे. डाळ मंद गॅसवर एक तास तरी शिजवत ठेवावी. डाळ जशी शिजत येइल तशी त्यावर एक मखमली लेअर तयार हेउ लागेल.आता डाळीत फेटलेल फ्रेश क्रीम व अजून बटर घालून डाळ हलवून घ्यावी.
5गरमागरम दाल मखनी वर कसुरी मेथी आणि क्रीम घालून लच्छा पराठ्या बरोबर सर्व्ह करावी. थंडीत मस्त मखमली दाल चा अस्वाद घ्यावा