अनोख्या परंपरेची दाजीबा वीर यात्रा

 अनोख्या परंपरेची दाजीबा वीर यात्रा

नाशिक, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सुमारे 300 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या दाजीबा वीरांची मिरवणूक आणि घरोघरी दाजीबा वीरांचे पूजन औक्षण होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी संपन्न झाले. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील धानोरी दिंडोरी रस्त्यावरील अकराळे फाटा येथील मंदिर आणि नाशिक शहरात दाजीबा वीर पूजनाची आणि मिरवणुकीची ही ऐतिहासिक परंपरा आहे.

ऐतिहासिक आख्यायिकेनुसार जानोरी गावांमध्ये राहणारा तरुण गवळी खंडेरायाचा निशीम भक्त होता गावामध्ये दूध घालून झाल्यावर तो ईश्वरसेवेत आपला वेळ घालवीत असे सोळाव्या वर्षी त्याचा विवाह निश्चित होऊन अंगाला हळद लागली मात्र आपल्या नित्य कर्म करण्यासाठी तो दूध घेऊन निघाला यावेळी त्याच्यासोबत त्याचा कुत्राही होता मात्र वाटेत लुटारू कडून झालेल्या हल्ल्यामध्ये हा गवळी ठार मारला जातो. आपल्या धन्याची ही अवस्था पाहून त्याचा कुत्रा गावात जाऊन कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना घटनेची जाणीव करून देतो आणि नंतर आपल्या धन्याजवळच हा कुत्रा आपला जीव सोडतो इकडे गावकरी कष्टी मनाने गावी परत आल्यानंतर त्यांना ज्या ठिकाणी गवळी खंडेरायाची पूजा करीत असे तेथेच या तरुणाने दृष्टांत देऊन सांगितले की जो कोणी माझी राहिलेली लग्नाची इच्छा पूर्ण करेल त्याची इच्छा मी पूर्ण करीन हेच गवळी दाजीबा वीर म्हणून पुढे दैवतासम मानले जाऊ लागले.

दिंडोरी जवळच्या परिसरात ज्या ठिकाणी हल्ल्यांमध्ये दाजीबा वीरांचा मृत्यू झाला तेथे आज एक मंदिर असून शेजारी त्यांच्या कुत्र्याची समाधी आहे सध्या नाशिक शहरात वास्तव्य असलेले भागवत आणि बेलगावकर कुटुंबीय हे दाजीबा वीरांचे वंशज मानलें जातात या कुटुंबातून दरवर्षी भर जरी वस्त्रे दाग दागिने हातात सोन्याचे कडे पायात जोडा अशा थाटात दाजीबा वीर यसोजी वीर अशा दोघा भावांचे स्वतंत्र मिरवणूक निघून गोदावरी नदीवर या भावांची भेट होऊन मिरवणूक संपते. दाजीबा वीरांच्या विवाह अपुरा राहिल्यामुळे घरोघर चे भाविक दाजीबांना बाशिंग अर्पण करतात तसेच एखाद्या व्यक्तीचा विवाह ठरत नसेल तर नवस बोलून दाजीबांच्या मुखवट्याला स्पर्श करून बाशिंग अर्पण केल्यास विवाह कार्य संपन्न होते.

याशिवाय विवाहानंतरही कोणा जोडप्याला अपत्य सुख नसल्यास दाजीबांना नवस बोलून नवस फेडताना पाळणा आणि नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे वीरांच्या मिरवणुकीत मार्गावरील प्रत्येक घरासमोर महिला वीरांचे औक्षण करतात पुष्पवृष्टी केली जाते, पुष्पहार अर्पण केला जातो आणि मगच वाद्यांच्या गजरात मिरवणूक पुढे मार्गस्थ होते. मिरवणुकीमध्ये विविध देवदेवतांची तसेच वीर व्यक्तींची वेशभूषा केलेली, विशेषतः बालके सहभागी होतात तसेच ज्या घरांमध्ये वीरांचे टाक पूजेमध्ये आहेत अशा टाक दाजीबा वीरांच्या मिरवणुकी बरोबर वाजत गाजत गोदावरी नदीवर देऊन तेथे स्नान घातले जाते आणि त्यानंतर पुन्हा घरी नेऊन त्यांना तळी भरून देवघरात बसवले जाते .

ही मिरवणूक शहराच्या मुख्य रस्त्यावरून गोदावरी नदीवर पोहोचण्यासाठी सुमारे 16 तासांचा अवधी लागतो. धुलिवंदनाच्या दिवशी सायंकाळी निघालेल्या वीरांच्या मिरवणुकीमुळे शहरातील रविवार कारंजा राम कुंड गोदावरी नदी परिसरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती त्यामुळे यात्रेच्या स्वरूप प्राप्त झाले होते शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या गर्दीमुळे पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात होते. Dajiba Hero Yatra of unique tradition

ML/ML/PGB
26 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *