दहीहंडी फोडताना मुंबई महानगरात एकाचा मृत्यू तर ९२ गोविंदा जखमी , दोघे गंभीर

मुंबई, दि. 16 : वरुणराजाची प्रचंड बरसात सुरु असताना देखील आज मुंबई महानगर आणि परिसरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या थरारक उपक्रमाला गालबोट लागले असून मुंबई महानगरात एक गोविंदाचा मृत्यू झाला असून तर ९२ गोविंदा जखमी झाले तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.
प्रा.आ.व्य.कक्ष – ठा.म.पा.:- आज दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांची माहिती खालीलप्रमाणे:-
(२१:०० वाजेपर्यंत प्राप्त माहिती)
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल गोविंदा -(एकूण – १२)
१) कु. आदित्य रघुनाथ वर्मा (पु / १८ वर्षे / राहणार – रूम नं. ११३, शिव साई चाळ, वाघोबा नगर, कळवा, ठाणे (पू.) यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
पुढील उपचाराकरिता जे.जे. रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.
२) कु. कृष्णा मिठू स्वयन (पु / १३ वर्षे/ राहणार – रूम नं. ६३३/३६२, मिठू शेठ चाळ, मुंबई पुणे रोड, पारसिक नगर, मुंब्रा, ठाणे / एकता मित्र मंडळ) यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे.
उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
३) कु. समर बन्सीलाल राजभर (पु / १० वर्षे / राहणार – लक्ष्मीवाडी, अतकोनेश्वर नगर, कळवा, ठाणे (पू.) यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
४) कु. निशांत संतोष सावंत (पु / ०५ वर्षे/ राहणार – रूम नं. ०२, दीपा निवास, कृपेश्वर कॉलनी, भांडुप, मुंबई (प.) यांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे.
५) श्री. सौरभ प्रकाश जाधव (पु / २६ वर्षे / राहणार – रूम नं. ०४, मातोश्री चाळ, समर्थ नगर, भांडुप, मुंबई (प.) यांच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे.
६) श्री. चंदन जैस्वाल (पु / २३ वर्षे/ राहणार – मनोरमा नगर, मानपाडा, ठाणे) यांच्या कंबरेला दुखापत झाली आहे.
७) श्री. अक्षय शर्मा (पु / २६ वर्षे/ राहणार- मनोरमा नगर, मानपाडा, ठाणे) डाव्या हाताला दुखापत झाली आहे.
८) कु. अजय परशुराम नरगडे (पु / १५ वर्षे / राहणार – एरोली, नवी मुंबई/ शिवशक्ती गोविंदा पथक, नवी मुंबई) यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे.
९) श्री. सर्वेश चव्हाण (पु / २७ वर्षे / राहणार – वागळे इस्टेट, ठाणे / बजरंग बली गोविंदा पथक) यांच्या छातीला दुखापत झाली आहे.
१०) श्री. शंकर पाटील (पु / २७ वर्षे / राहणार – गणपती चाळ, घोलाई नगर, कळवा/ भोलेश्वर गोविंदा पथक) यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.
११) कु. साहिल भोईर (पु / १९ वर्षे/ राहणार – बाळकुम पाडा नं. ०३, ठाणे / स्थानिक नागरिक) यांच्या कंबरेला दुखापत झाली आहे.
१२) श्री. अनुप यादव (पु / ३५ वर्षे / राहणार – अतकोनेश्वर, कळवा) त्यांच्या पाठीला दुखापत झाली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे दाखल गोविंदा-(एकूण – ०५)
१) कु. शिवराज पवार (पु / १० वर्षे / राहणार – साठे नगर, वागळे इस्टेट) यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे.
२) श्री. रोहन पागे (पु / २४ वर्षे / राहणार – कोपरी, ठाणे (पू.) / आई चिखलादेवी गोविंदा पथक) यांच्या नाकाला दुखापत झाली आहे.
३) श्री. कल्पक पाटील (पु / ३५ वर्षे / राहणार – कोपरी, ठाणे (पू.) / आई चिखलादेवी गोविंदा पथक) यांच्या पाठीला दुखापत झाली आहे.
४) कु. करण पवार (पु / १७ वर्षे / बंजारा वस्ती, सेवालाल नगर, वागळे इस्टेट / स्थानिक नागरिक) यांना किरकोळ खरचटलं आहे.
५) कु. सिद्धू सुहास मुंडा (पु / ११ वर्षे / राहणार – बंजारा वस्ती, सेवालाल नगर, वागळे इस्टेट/ स्थानिक नागरिक) छातीला किरकोळ खरचटलं आहे.
अंधेरी येथील गावदेवी गोविंदा पथकातील गोविंदा, ज्याला पूर्वी कावीळ झाली होती, तो टेम्पोमध्ये बसला होता आणि त्याने दहीहंडीत भाग घेतला नाही. तो बेशुद्ध पडला आणि त्याला खाजगी रुग्णालयात आणि नंतर राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले.
रोहन मोहन वळवी, वय १४ वर्षे, याला मृत घोषित करण्यात आले. स्थानिक पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.