दहि-बुत्ती

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
तांदूळ, दूध, दहि, कोथिंबीर (बारीक चिरून).
फोडणीकरता (अंदाज आणि आवडीप्रमाणे) – तेल, मोहरी-जिरे, सुक्या लाल मिरच्या (लहान तुकडे करून), हिरव्या मिरच्या (अगदी बारीक कापून किंवा उभ्या अर्ध्या कापून), कढिपत्ता.
प्रमाणः दोन माणसांकरता
तांदूळ – एक वाटी
दूध – दोन ते अडीच वाट्या (गरम करून, साईसकट)
दही – २-३ टेबलस्पून
क्रमवार पाककृती:
तांदूळ धुऊन काहीसा मऊ भात करून घ्यावा. तो होत असतानाच दुसर्या भांड्यात तेल घालून गरम झाल्यावर मोहरी-जिरे (हिंग नको), सुक्या मिरच्या, हिरव्या मिरच्या, कढिपत्ता घालून फोडणी करून घ्यावी. भात गरम असतानाच फोडणीत घालावा. चवीप्रमाणे मीठ घालून कालवून घ्यावा. त्यात दूध कोमट करून घालावे. साय असेल तर ती सुध्दा घालावी. पुन्हा कालवून झाकून ठेवावे. ५-७ मिनिटांत सगळे दूध भातात शोषले जाते. गार झाल्यावर आयत्यावेळी जेवढे हवे तेवढे दही घालून, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट कालवून वाढावा.
दहि-बुत्ती
ML/ML/PGB
2 Jun 2024