‘दगडूशेठ’ गणपती मंदिराला अंगारकीनिमित्त भव्य पुष्पआरास

 ‘दगडूशेठ’ गणपती मंदिराला अंगारकीनिमित्त भव्य पुष्पआरास

पुणे दि ६ : ओम् गं गणपतये नम :…गणपती बाप्पा मोरया… जय गणेश… मंगलमूर्ती मोरया… अशा गणेश नामाच्या जयघोषाने ‘दगडूशेठ’ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. नववर्षातील पहिला अंगारकी संकष्टी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली पारंपरिक आकर्षक पुष्पसजावट आणि विद्युतरोषणाने संपूर्ण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उजळून निघाले होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक, श्री गणेशयाग देखील मंदिरात पार पडला. याशिवाय श्रीं च्या मंगलआरती भाविकांनी मोठया संख्येने गर्दी केली.

मंदिरावर केलेल्या पुष्पसजावटीकरिता झेंडू, गुलाब, शेवंती आदी फुले वापरुन पारंपरिक सजावट करण्यात आली होती. तर, सभामंडपात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली. मंगळवारी पहाटेपासून भाविकांकरीता दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांनी पहाटेपासूनच मोठया संख्येने गर्दी केली. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर रस्ता, अप्पा बळवंत चौकाच्या पुढे पर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिरावर आकर्षक तोरण आणि रांगोळ्यांची सजावट देखील करण्यात आली होती.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *