दडपे पोहे एकदा तरी ट्राय करून पहा
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लागणारे जिन्नस:
पातळ पोहे- ३ वाट्या
कांदे -दोन बारीक चिरलेले
टोमॅटो -एक बारीक चिरलेला
भाजलेले शेंगदाणे – आवडीनुसार
खवणलेला ओला नारळ- दीड वाटी
मिरची आलं वाटण- चवीनुसार
नारळ पाणी- दीड वाटी
एका मोठ्या लिंबाचा रस
धणे भरड – एक चमचा
मीठ आणि साखर -चवीनुसार
कोथींबीर बारीक चिरलेली
तेल आणि जिरे -फोडणीसाठी
डाळिंब दाणे आणि सांडगी मिरची
क्रमवार पाककृती:
पातळ पोहे प्रथम चाळून एका परातीत घ्यावेत. त्यात दीड वाटी नारळ पाणी घालावे, एकदम कोरडे वाटले तर साध्या पिण्याच्या पाण्याचे दोन तीन हबके मारावेत. त्यात आता एक वाटी ओले खोबरे घालावे. लिंबू पिळावे. कांदा, टोमॅटो, कोथींबीर आणि मिरची आले वाटण लावावे. धणे भरड घालावी. शेंगदाणे घालावेत. डाळिंब आणि सांडगी मिरची घालावी. आता हे सगळे नीट हलक्या हाताने एकत्र करावे. आता ह्यावर ताट ठेऊन त्यावर वजन ठेऊन हे सारे अर्धा -पाऊण तास दडपावे. खाण्याआधी उरलेला अर्धा वाटी ओला नारळ घालावा. वरून जिऱ्याची फोडणी घाला, दडपे पोहे तयार.
ML/ML/PGB 8 May 2024