ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

बॉलिवूडमधील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. ७० व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये मिथुन चक्रवर्तींना हा सन्मान दिला जाणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करुन ही घोषणा केली आहे. मनोरंजन विश्वासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.