लवकरच हटवण्यात येणार दादरचा कबुतरखाना

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई शहरामध्ये कबुतरांच्या अतिरिक्त प्रमाणात वाढत्या संख्येमुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील ठिकठिकाणी कबुतरांना मुबलक प्रमाणात धान्य खाऊ घातले जात असल्याने कबुतरांचा वावर वाढत आहे. यातीव मुख्य ठिकाण म्हणजे दादर सारख्या गजबजलेल्या ठिकाणचा कुबुतर खाना. नागरिकांच्या असंख्य तक्रारींनंतर आता पालिकेकडून हा कबुतरखाना हटवण्यात येणार आहे.
कबुतरांच्या विष्ठेमधून निघणाऱ्या सूक्ष्म कणांमुळे स्थानिक रहिवाशांना श्वसनाचे विकार होण्याचा धोका वाढला आहे. त्यातच कबुतरखान्याजवळील प्रसिद्ध खाऊ गल्ली आणि फूड स्टॉल्सवरील गर्दीमुळे आरोग्य समस्यांचा धोका अधिक वाढला आहे.कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांमुळे हा निर्णय घेतला जात आहे. कबुतरखाना वरळी किंवा प्रभादेवी येथे स्थलांतरित करण्याचा पालिकेचा विचार आहे. अशातच शहरात इतर ठिकाणी असणारे कबुतरखाने देखील हटवण्याची मागणी होत आहे.
SL/ML/SL
21 March 2025