दादर कबुतरखाना प्रकरण- शस्त्र उचलण्याची जैन मुनींची धमकी

 दादर कबुतरखाना प्रकरण- शस्त्र उचलण्याची जैन मुनींची धमकी

मुंबई, दि. १० : मुंबईतील कबुतरखान्यांवरून सध्या जोरदार वाद सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना अन्न देण्यास बंदी घातली आहे. तरीही, या निर्णयाला डावलून जैन समाजातील काही व्यक्ती कबुतरांना खाद्य पुरवत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून आता जैन समाजाने उपोषणाचा मार्ग स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी 13 तारखेपासून समाज उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.”सरकारी सूचनेनंतर कबुतरांना अन्न देणे सुरू झाले आहे. निवडणुकीचा विचार करून हे चालू आहे. आमचे पर्युषण संपल्यानंतर पुढील पाऊल ठरवू. 13 तारखेला याबाबत अंतिम निर्णय घेऊ. आम्ही सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहोत. कबुतरांना अन्न देण्यास बंदी घातल्यास 13 तारखेनंतर आम्ही उपोषणाला सुरुवात करू, जीव दया आमच्या धर्मात आहे, जैन धर्माला का लक्ष्य केले जात आहे? मी एकटा आंदोलनाला बसणार नाही. देशभरातली 10 लाख जैन बांधव इकडे उपोषणाला बसतील, असा इशारा निलेशचंद्र विजय यांनी दिला.” असे निलेशचंद्र विजय यांनी स्पष्ट केले.

तसेच, “जैन समाज सौजन्याचा आहे. शस्त्रे उचलणे आमचे धोरण नाही. काही आंदोलनादरम्यान शस्त्रे वापरली गेली, पण ते आमचे लोक नव्हते. तरी गरज भासली तर धर्माच्या रक्षणासाठी आम्ही शस्त्रेही धरू. आम्ही संविधानाला, न्यायालयाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आदर देतो. पण जर आमच्या धर्मावर हल्ला झाला, तर आम्ही कोर्टालाही मानणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. दारू आणि कोंबड्या खाऊन किती लोक मरतात, हेही दाखवावे. आम्ही पालिकेकडे कबुतरांना खाद्य द्यायला परवानगी मागितली आहे. मुंगीपासून ते हत्तीपर्यंत कोणताही जीव मरता कामा नये, हे आमच्या धर्मात लिहिलं आहे, असेही जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे

याशिवाय, “पालिका, न्यायालय किंवा प्रशासनाने आम्हाला नकार दिल्यास आम्ही आंदोलन छेडू. जीवदया हा आमच्या धर्माचा मूलमंत्र आहे. जैन धर्माला का लक्ष्य केले जाते? आम्ही पालिकेकडे अन्न देण्याची परवानगी मागितली आहे. पुन्हा याच ठिकाणी आंदोलन होईल. देशभरातील लाखो जैन बांधव येथे शांततेत जमतील. मी एकटा राहणार नाही. मुंगीपासून हत्तीपर्यंत प्रत्येक प्राण्याचे रक्षण करणे हा आमचा धर्म आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *