डबेवाला पुतळ्याला नवा साज द्या

 डबेवाला पुतळ्याला नवा साज द्या


मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दक्षिण मुंबईतील हजी अली चौकातील डबेवाला कामगार पुतळा आहे. हा पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, विद्युत रोषणाई आणि उंच चौथऱ्यावर पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनने मुंबई महापालिका प्रशासनाकडे केली आहे.Dabevala give the statue a new look

मुंबईत सध्या सुशोभिकरणाचे पेव फुटले आहे. बहुतेक ठिकाणी फुटपाथ नवीन केली जाते आहे. बहुतांश चौकांचे नुतनीकरण केले जाते आहे. विद्युत खांबांना लईडी लाईट बसवल्या जात आहेत. भिंती रंगवल्या जात आहेत. या मुळे मुंबईच्या सौंदर्यात भर पडत आहे. हा बदल निश्चित स्वागतार्य आहे. या हाजीअल्ली चौकात “डबेवाला कामगार” याचा भव्य पुतळा आहे. दक्षिण मुंबईतील बाकीचे पुतळे पाहीले तर ते ठरावीक चौथऱ्याच्या उंचीवर आहेत, त्यामुळे ते शोभिवंत व आकर्षक दिसतात व लांबून पाहीले तरी लोकांच्या दृष्टीस पडतात. पण डबेवाला कामगार याचा पुतळा थेट जमिनीवर लावण्यात आला आहे. त्यामुळे तो पुतळा जवळ गेल्या शिवाय दिसत नाही. त्यामुळे पुतळ्यासाठी ठराविक उंचीचा चौथरा बांधा व त्या चौथऱ्यावर हा पुतळा ठेवा, जेणे करून तो बहुतांश लोकांच्या दृष्टीस पडेल. तसेच पुतळा परिसराचे नव्याने नुतनीकरण करण्यात यावे.
रात्रीच्या वेळेत या पुतळ्यावर अंधार येत असल्याने लगेच दिसून येत नाही. त्यामुळे लाईटची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी मुंबई महापालिका आयुक्तांकडे केल्याचे मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.

ML/KA/PGB
20 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *