वाह रे पठ्ठ्या! डी गुकेशने अशी केली भितीवर मात, व्हिडिओ व्हायरल

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :18 व्या वर्षी डी गुकेशने वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचा किताब जिंकला. जर तो वर्ल्ड चॅम्पियन झाला, तर तो त्याच्या भितीवर मात करण्यासाठी त्यांच्यासोबत बंजी जंपिंग करेल, असं वचन गुकेशने त्याचे कोच ग्रेगोर्झ गजेव्स्की यांना वचन दिलं होतं. त्याप्रमाणे त्याने सिंगापूरमध्येच ही स्पर्धा जिंकल्यावर हे वचन पूर्ण केले आणि तिथे बंजी जंपिंग केली. सध्या गुकेशचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ML/ML/PGB 17 Dec 2024