२१ ऑक्टोबरला अरबी समुद्रात घोंगावणार ‘तेज’ चक्रीवादळ

 २१ ऑक्टोबरला अरबी समुद्रात घोंगावणार ‘तेज’ चक्रीवादळ

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या राज्यभर ऑक्टोबर हिटमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्यभरातून मान्सून माघारी फिरण्याची क्रिया बहुतांश पूर्ण झालेली असताना आता हवामान विभागाने २१ ऑक्टोबर रोजी अरबी समुद्रात ‘तेज’ हे चक्रीवादळ घोंगावणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबई शहराला या वादळाचा विशेष फटका बसणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राज्यभरात पावसाने विश्रांती घेतली आहे मात्र मान्सून परतीच्या वाटेवर असतानाच अरबी समुद्रात कमी दाबाचे श्रेत्र निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अरबी समुद्रातील या हवेच्या दबावामुळे मुंबई शहरात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तसेच शहरात वेगाने वारे आणि मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे. या चक्रीवादळाचा समुद्रसमाटीपासून ३.१ किमी उंचीपर्यंत प्रभाव दिसून येत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ ऑक्टोबरपर्यंत मध्य अरबी समुद्रावर हवेचा दबाव अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे मध्य आणि दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे आणि कोमोरिन क्षेत्रात कमी ते मध्यम स्वरूपाचे विखुरलेल्या स्वरूपातील ढग तयार होत आहेत. त्यामुळेच देशाच्या दोन्ही किनारपट्ट्यांवर चक्रीवादळं निर्माण झाल्यास ती पुढील 9 दिवसांमध्ये धडक देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

SL/KA/SL

18 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *