विद्यार्थ्यांकरिता सुरू आहे ‌ “सायकल लायब्ररी”

 विद्यार्थ्यांकरिता सुरू आहे ‌ “सायकल लायब्ररी”

महाड, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहती मधील हायकल या लाईफ सायन्सेस कंपनीकडून तालुक्यातील अत्यंत दुर्गम परिसरात असलेल्या वलंग गावातील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींकरिता “बायसिकल लायब्ररी” हा अभिनव प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे.

या प्रोजेक्टमध्ये कंपनीकडून ५९ सायकली विद्यार्थ्यांकरता देण्यात आल्या आहेत. न्यू इंग्लिश स्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गांमध्ये खाडी विभागातील शेतकरी आदिवासी कुटुंबातील १३६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
त्यापैकी ८२ विद्यार्थी गरीब आदिवासी आणि शेतकरी कुटुंबातील आहेत.

बहुतांश विद्यार्थी शाळेत येण्यासाठी दररोज ३ ते ४ किमी चालतात. या विद्यार्थ्यांसाठी सहज उपलब्ध होतील अशा वाहतुकीच्या कार्यक्षम सुविधा असणे गरजेचे होते. या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या समस्या दूर करण्यासाठी पर्यावरणानुकूल उपाय पुरवणे हे या बायसिकल लायब्ररी प्रोजेक्टचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या बायसिकल लायब्ररीमध्ये ५९ सायकल्स असून गावातील मुलांना दररोज शाळेत येण्या-जाण्यासाठी त्या सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

शिक्षणाचे महत्त्व हायकल कंपनीने ओळखून, प्रत्येक विद्यार्थ्याला वाहतुकीच्या अडचणी सहन कराव्या न लागता दर्जेदार शिक्षण मिळवण्याची संधी देण्यासाठी ही कंपनी प्रयत्न करीत आहे. या सायकल्सची देखरेख शाळा करेल आणि त्या दीर्घकाळपर्यंत उपयोगात आणता याव्यात याची काळजी घेईल . ” विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा उपलब्ध करवून देण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूलसोबत सहयोग करण्याचा हा उपक्रम वर्गातील उपस्थिती वाढवण्यात मदत करेल. यामुळे हायकलच्या या सीएसआर उपक्रमाने विद्यार्थ्यांची आरोग्य देखभाल आणि शैक्षणिक उन्नती साध्य होऊ शकेल.

ML/KA/SL

11 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *