सायबर हेल्पलाईन 1930 मुळे गुन्हयात फसवणुक झालेली संपूर्ण रक्कम वाचविण्यात यश

 सायबर हेल्पलाईन 1930 मुळे गुन्हयात फसवणुक झालेली संपूर्ण रक्कम वाचविण्यात यश

मुंबई दि.23 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई शहरातील नागरीकांची सायबर गुन्हयामध्ये फसवणुक झालेली रक्कम सबंधित बँक खात्यामध्ये गोठविण्याकरीता मुंबई पोलीस गुन्हे शाखेअंतर्गत 1930 हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. याद्वारे सायबर गुन्हयात आर्थिक फसवणुक झालेले तक्रारदार यांनी त्यांची फसवणुक झालेनंतर 1930 हेल्पलाईनवर तात्काळ संपर्क केला असता संबधित बँक, वॉलेट, मर्चेंट इ. नोडल अधिकारी यांच्याशी तात्काळ समन्वय साधुन फसवणुक झालेली रक्कम सबंधित बँक खात्यांवर गोठविण्यात येते.

22 मे रोजी साकीनाका, मुंबईमध्ये राहणारे व खाजगी कंपनीत नोकरी करणारे तक्रारदार यांना आरोपीनी ते स्वतः पोलीस अधिकारी व आयकर अधिकारी असल्याचे सांगुन फिर्यादी यांचे नावे फेडेक्स कुरियर आलेले असून त्यांच्या बँक खात्यामार्फत अनाधिकृत ट्रांन्झेक्श्न झाल्याचे सांगितले . तसेच त्यांना अटक करण्याचे भय दाखवून दोन ट्रांन्झेक्श्न मार्फत रूपये 39 लाख 88 हजार 526रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.

या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी १९३० सायबर हेल्पलाईनवर संपर्क करून माहीती दिली. त्यावरून पोउनि. मंगेश भोर, पो. हवा.क्र. महेश मोहीते व पो.शि.क्र. किरण पाटील यांनी तात्काळ एनसी आरपी पोर्टल (NCRP PORTAL) वर तक्रार दाखल करून संबधित बँकेच्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. तातडीने केलेल्या कार्यवाहीमुळे तक्रारदार यांची सायबर गुन्हयात फसवणूक झालेली संपुर्ण रक्कम 39 लाख 88 हजार 526 (एकोणचाळीस लाख अठ्‌ठयाऐंशी हजार पाचशे सव्वीस रूपये) संबधित बँक खातेवर होल्ड करण्यात 1930 हेल्पलाईन पथक, गुन्हे शाखा, मुंबई यांना यश आले आहे.

SW/ML/SL

23 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *