तलवारीने केक कापणे महागात पडले

 तलवारीने केक कापणे महागात पडले

मुंबई, दि.1( एम एमसी न्यूज नेटवर्क): सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे विक्रोळी येथील तरुणांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या वाढदिवस सोहळ्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यांच्याकडून केक कापण्यासाठी वापरण्यात आलेली तलवार हस्तगत करण्यात आली आहे.

प्रदयुम गुलाब यादव (वय 25)असे या तरुणाचे नाव असून तो विक्रोळी माच्छी मार्केट येथे वास्तव्यास आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांनी हत्यार बंदीचे आदेश जारी केले असताना , विक्रोळी पूर्वकडील सोनवणे चाळ, मच्छी मार्केट जवळ, प्रद्युम यादव या तरुणाने वाढदिवसानिमित्त सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना तलवारीने केक कापून मित्रांसह वाढदिवस साजरा केला. वाढदिवस सोहळ्याचा व्हिडीओ त्याने समाजमाध्यमांवर व्हायरल केला.

समाजमाध्यमांवरून हा व्हिडीओ पोलिसांपर्यत पोहोचला. पोलिसांनी या व्हिडीओचा बारकाईने अभ्यास करून
या तरुणाविरुद्ध शत्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) सह १३५ अनव्ये  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन प्रदयुम यादव याला अटक केली.

SW/KA/SL

1 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *