बेदाणा उत्पादन शेतकऱ्यांचे पैसे आता 21 दिवसात …
सांगली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना 21 दिवसात पेमेंट देण्याचा निर्णय सांगली मध्ये पार पडलेल्या बैठकीत झाला आहे.तसेच बेदाण्याचे पेमेंट 21 दिवसात न दिल्यास दोन टक्के व्याज आणि बेदाणा बॉक्सचे निम्मे पैसे देण्याचे भूमिका बेदाणा व्यापाऱ्यांकडून घेण्यात आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना,जिल्हा उपनिबंधक आणि बेदाणा व्यापारयांच्यामध्ये पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच 500 ग्रॅमहुन अधिक तूट धरणाऱ्या व्यापाऱ्यावर सौद्यात भाग घेण्यास बंदी घालण्याचा निर्णयही या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
स्वाभिमिनी शेतकरी संघटनेकडून नुकताच बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता.त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांच्या कडून सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये बेदाणा व्यापारी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यामध्ये बैठक घेण्यात आली, ज्यामध्ये विविध प्रश्नांवर चर्चा पार पडली,यामध्ये उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत, जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे.
ML/KA/SL
23 May 2023