बीड जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल, जमावबंदी कायम
बीड, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी बीड मध्ये हिंसक आंदोलनामुळे जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू केलेली संचारबंदी दरम्यान आज सकाळी सहा वाजता शिथिल करण्यात आली आहे.मात्र जमावबंदी आदेश पुढील काही काळासाठी चालू राहणार आहे.
जोपर्यंत परिस्थिती शांत होत नाही तोपर्यंत ती सुरू असणार आहे तसेच जिल्ह्यातील सर्व इंटरनेट सुविधा देखील बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी म्हटले आहे तसेच जिल्ह्यातील शाळा आणि इतर आस्थापने चालू राहणार आहेत अशी माहिती बीड च्या जिल्हाधिकारी यांनी दिली.
सर्व जिल्हावासीयांनी शांतता राखावी कुठल्याही प्रकारचा अनर्थ किंवा काही प्रकार घडू नये यासाठी सतर्क रहावे तसेच जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
धाराशिवमध्ये मात्र कायम
धाराशिव जिल्ह्यात लागू केलेली संचारबंदी मात्र कायम ठेवण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व शाळा , महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलनात काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी ही खबरदारी घेण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
SL/KA/SL
1 Nov. 2023