संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तीन सिंह शावकांचा जन्म
मुंबई, दि १४:– संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्यजीव संवर्धनाच्या दिशेने मोठं यश मिळालं असून सिंहिणी भारती आणि सिंह मानस यांना तीन निरोगी सिंह शावकांचा जन्म झाला आहे १९ जानेवारी २०२६ रोजी रात्री हा जन्म झाला
हे सिंह केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या अदलाबदल कार्यक्रमांतर्गत गुजरातमधील जुनागढ येथील सक्करबाग प्राणीसंग्रहालयातून मुंबईत आणण्यात आले होते या नव्या जन्मामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं वन्यजीव संवर्धन आणि संशोधन केंद्र म्हणून असलेलं महत्त्व अधिक बळकट झालं आहे. AG/ML/MS