वाघीण आणि बछड्यांनी केलेल्या हल्ल्यात रानगव्याची शिकार , व्हिडीओ वायरल…
चंद्रपूर दि २६:–चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना बफर भागात वाघ कुटुंबाने केलेल्या रानगव्याच्या शिकारीचा व्हिडीओ सध्या वायरल होत आहे. कॉलरवाली वाघीण आणि तिचे 3 बछडे रानगव्याला घेरून शिकारीच्या प्रयत्नात होते. चाहूल लागताच रानगव्याने निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र चारही बाजूने घेरून वाघ कुटुंबाने आधी रानगव्याला जायबंदी केले. आणि नंतर शिताफीने जमिनीवर लोळवले. या संघर्षात वाघ कुटुंबाची रणनीती सफल ठरली. वायरल व्हिडीओत हे स्पष्ट झाले. ML.MS