मुंबईत CSMT परिसरात तरूणीवर सामूहिक बलात्कार

 मुंबईत CSMT परिसरात तरूणीवर सामूहिक बलात्कार

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांत बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. आता मुंबईत आणखी एक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडवली आहे. २९ वर्षीय एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचं अपहरण करून तिला टॅक्सीमध्ये नेलं गेलं आणि तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंता पसरली आहे.

TR/ML/PGB
4 Oct 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *